प्रत्येक मूल शिकलं पाहिजे जि प शाळा शिंदी येथील प्रेरणा सभा आणि रंगमंच उद्घाटन सोहळ्यात प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांचे प्रतिपादन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी ता. भुसावळ येथे प्रेरणा सभा आणि सावित्रीबाई फुले रंगमंच ओटा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.अनिल झोपे उद्घाटक म्हणून मंचावर उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून लोकसहभाग कसा मिळवावा ते शिंदी शाळेतील आदर्श शिक्षक समाधान जाधव सर यांच्याकडून शिकावे. त्यांनी शाळेत मिळविलेल्या लोकसहभागाबद्दल मुख्याध्यापक आणि सर्व उपशिक्षकांचे कौतुक केले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने व शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बाला उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वी होण्याच्या दृष्टीने मिळालेला लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यातून गावातील प्रत्येक मूल गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकेल. गावाचा पाठिंबा व शिक्षकांची मेहनत यांचा एकत्रित परिणाम अभिमानास्पद कामगिरीसाठी साहाय्यभूत ठरतो.
लोकसहभागातून रंगमंच ओटा बांधकाम, ॲम्पी थिएटर ओटा बांधकाम झाडांना भौमितिक आकार ओटे बांधकाम, बाला उपक्रमांतर्गत 43 मुद्द्यांसाठी शैक्षणिक चित्रे रंगकाम आणि शाळा डिजिटल करण्यासाठी संगणक, टीव्ही त्याचप्रमाणे, शाळेच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी लाईट फिटिंग, प्रत्येक वर्गात फॅन, गोदरेज स्टील कपाट असे प्रमाणात भरपूर लोकसहभाग मिळवलेला आहे. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकरी आणि शिक्षक यांना आवाहन केले की आपण सुद्धा शिंदी या शाळेतील शिक्षकांप्रमाणे प्रेरणा सभा घेऊन लोकसहभाग मिळवून आपल्या शाळा सुसज्ज केल्या पाहिजे. शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक साहित्य गावांमधून लोक सहभागातून मिळवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शाळेत येणार प्रत्येक मूल शिकल पाहिजे, शाळेतील प्रत्येक मुलाला भाषा विषयाचे वाचन, लेखन गणितामध्ये मूलभूत क्रिया, इंग्रजी विषयाचे वाचन लेखन आलंच पाहिजे. याविषयी त्यांनी आवर्जून गावकरी आणि शिक्षकांना सांगितले. हे सर्व शिक्षकांनी आपलं आद्य कर्तव्य म्हणून पार पाडले पाहिजे. तेव्हाच आपल्या शाळा गुणवत्तापूर्ण होतील. आजही आपल्या जिल्हा परिषदेच्या काही शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. त्याबद्दल उपस्थित शिक्षकांचं त्यांनी कौतुक केले.
शाळेसाठी मोठ्या प्रमाणात लोकसभा मिळवून दिल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदी शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने आणि उपस्थित सर्व अधिकारी वर्गाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
प्रेरणा सभेचे मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शाळेतील माजी विद्यार्थी ज्यांनी शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर कार्यरत असतील, नोकरीला असतील तसेच उच्च प्रतिष्ठित गावकरी, ग्रामस्थ यांनी शाळेला लोकसहभाग दिला पाहिजे आणि शिंदी शाळेसारखी शाळा सर्व भुसावळ तालुक्यातील ग्रामस्थांनी, शिक्षकांनी करावी असे आवाहन शिक्षकांना केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक अधिव्याख्याता, डायट जळगाव शैलेश पाटील यांनी शिंदी गावातील गावकऱ्यांचं भावनिक नातं शाळेशी जुळलेले आहे. या भावनिक नात्यामुळे सर्व माजी विद्यार्थी, गावकरी शाळेला मोठ्या प्रमाणात लोक सहभाग देत आहेत. त्याबद्दल त्यांनीही त्यांचे गावकऱ्यांचे, शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक सेवानिवृत्त, डी वाय एस पी मुंबई, दिलीप सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी माझ्या सेवानिवृत्तीचे 40 लाख रुपये मी माझ्या दुसखेडा गावासाठी खर्च केलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी स्कूल बस,आजारी लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी ॲम्बुलन्स सेवा, सामाजिक कार्यासाठी प्रशस्त हॉल, सुसज्ज वाचनालय अशा अनेक गोष्टी त्यांनी गावासाठी केलेल्या आहे आणि त्याच प्रमाणे शिंदी शाळेतील शिक्षकांनी सुद्धा लोकसहभागातून शाळा अतिशय आकर्षक केलेली आहे. त्यामुळे ते प्रभावित प्रभावित होऊन पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची स्कूल बॅग भेट देण्याचे जाहीर केले.
बहिणाई देवराम सपकाळे यांचे स्मरणार्थ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले रंगमंचाचे उद्घाटन फित कापून प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी केले. हा रंगमंच शिंदी शाळेतील माजी विद्यार्थिनी, सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका जळगाव, लीला सपकाळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, जळगाव, कमल सपकाळे, सेवानिवृत्त उपकोषाधिकारी, जळगाव विमल सपकाळे या तिन्ही बहिणींनी शाळेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून आणि आपल्या आई-वडिलांचे कायम स्मरण राहावे म्हणून त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला रंगमंच ओटा बांधकाम करून दिले. या रंगमंच ओट्यासाठी सुमारे 95 हजार रुपये खर्च आला. हा सर्व खर्च या तिन्ही बहिणींनी सामूहिक रित्या उचलला. त्याबद्दल तिन्ही बहिणींचे सर्व अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक यांनी खूप कौतुक केले, अभिनंदन केले त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदी गावाचे उपसरपंच कैलास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा शिक्षण संस्था व प्रशिक्षण संस्था जळगावचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, अधिव्याख्याता, शैलेश पाटील, अधिव्याख्याता डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी, तुषार प्रधान, केंद्रप्रमुख किन्ही, दीपनगर, कुऱ्हे कमलाकर चौधरी उपस्थित होते .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त, डी वाय एस पी मुंबई, दिलीप सूर्यवंशी, कर्ज समिती अध्यक्ष, ग स सोसायटी जळगाव, योगेश इंगळे संचालक, प्राथमिक शिक्षक प्रतपेढी भुसावळ, प्रदीप सोनवणे, संचालक, सहसचिव, महाराष्ट्र राज्य विज्ञान संघ सुनील वानखेडे चेअरमन, उषा नॅशनल सायन्स सेंटर भुसावळ जीवन महाजन, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी भूषण झोपे ,राहुल भारंबे, ऑप्टिक कॉम्प्युटर भुसावळ, दिनेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
0 टिप्पण्या