Subscribe Us

रा. का. मिश्र विद्यामंदिर, बहादरपूर ता पारोळा जि जळगांव येथे एड्स दिन निमित्ताने उद्बोधन संपन्न*

अमळनेर:-  विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. आर. पी. बडगूजर यांच्या अध्यक्षेखाली आज १ डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्ताने विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. एस. बी. चौधरी यांनी एड्स दिनानिमित्ताने एड्स चा इतिहास, एड्सचा रोगप्रसार व  कोणत्या माध्यमातून पसरतो त्या रोगाविषयी गैरसमज, त्या रोगाची व्याप्ती व त्या रोगापासून आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे. असे विविध उदाहरणे देऊन त्या रोगाचे गांभीर्य व त्यापासून आपले स्वतःचे संरक्षण कसे करता येईल त्याला  *तरुणांच्या रोग* असे म्हटले जाते मग तरुणांनी कसे वागावे, कसे सुरक्षित रहावे, काय आचरणात आणावे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले गेले. *आपली एकता व आपली समानता* ही थीम या वर्षा ची कशी जोपासली जाईल याविषयी प्रत्येकाने कशी काळजी घ्यावी विशेषतः मुलींच्या बाबतीत *गुड टच बॅड टच* व *बाल लैंगिक शोषण* मुलींनी समाजात वावरताना किती जागृत राहावं या विषयी कसे सजग रहावे हे स्पष्ट शब्दात आपले मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री आर. पी बडगूजर यांनी काही उदाहरण घेऊन सध्याच्या तरुण पिढीत असलेल्या गैरसमज, मोबाईलचा वाढता वापर व मित्र-मैत्रिणी यांचे संबंध कसे असावेत या विषयी अनेक उदाहरणे देऊन आपले अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. श्री. बी. व्ही. सोनार यांनी केले तर आभार प्रा. श्री. जी. एस. पाटील यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी व ८ वी ते १२ वी चे सर्व विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाची संपूर्ण पूर्वतयारी तर कार्यक्रमासाठी लागणारी व्यवस्था शिक्षकेतर बंधूंनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या