अमळनेर :- मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण सर होते. प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. पी.पी. देशपांडे (दिवाणि वरीष्ठ न्यायाधीश) व .कुमारीका ए. यु यादव (दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश)तसेच राजेंद्र व्ही निकम (सदस्य अमळनेर वकील संघ) व श्री.किशोर आर बागुल (सहाय्यक सरकारी वकील) उपस्थित होते. सर्वप्रथम श्री. पी.पी. देशपांडे (दिवाणि वरीष्ठ न्यायाधीश) यांनी विद्यार्थांना राज्य घटनेतील प्रास्ताविका बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. राजेंद्र व्ही निकम (सदस्य अमळनेर वकील संघ)यांनी राज्यघटनेतील मुलभुत अधिकार व कर्तव्य याविषयी माहिती दिली. श्री.किशोर आर बागुल (सहाय्यक सरकारी वकील) यांनी संविधानातील महत्व विद्यार्थाच्या भाषेत समजावून सांगितले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शर्मा सरांनी केले. तसेच कार्यक्रमांची सांगता संविधानाच्या प्रतिज्ञेने झाली. या कार्यक्रमाला ॲडमिनीस्ट्रेटर सौ . दिपीका अमेय मुंदडा , शाळेचे प्राचार्य श्री . लक्ष्मण सर , प्रायमरी प्राचार्या सौ . विद्या मॅडम , प्रि – प्रायमरी को - ऑडीनेटर सौ . योजना ठक्कर हे सर्वजण उपस्थित होते.
0 टिप्पण्या