अमळनेर: आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय येथे संविधान दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाची उद्देशिकेचेही पूजन करण्यात आले. मंचावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर महाजन सर, जितेंद्र चौधरी सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर मॅडम आणि सायली देशपांडे मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संविधान वाचन विद्यालयाचे शिक्षक विजय सूर्यवंशी यांनी केले.
0 टिप्पण्या