Subscribe Us

*मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल मध्ये सायबर क्राईम आणि सिक्युरिटीचे मार्गदर्शन.*

अमळनेर प्रतिनीधी :- मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर येथे  इयत्ता 7 वी ते 10 वीच्या विद्यार्थाकरीता दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम आणि सिक्युरिटीचे  मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण सर होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणून सुनेट काॅम्युटर्सचे संचालक संजय पालकर हि होते. या शिबिरात संजय पालकर यांनी विद्यार्थांना सायबर क्राईम व सिक्युरिटी हि बाब किती महत्वाची आहे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. सायबर क्राईम विषयी विद्यार्थानी नेहमी सर्तक रहायला पाहिजे व आपली फसवणुक होऊ नये यांची दक्षता घ्यावी.यावेळी मुलांनी त्यांना आपल्या शंका विचारल्या व सरांनी त्यांचे योग्य प्रकारे निरासरण  केले .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवराज चौधरी सरांनी केले. तसेच कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने झाली. तसेच या कार्यक्रमाला ॲडमिनीस्ट्रेटर सौ . दिपीका अमेय मुंदडा , शाळेचे प्राचार्य श्री . लक्ष्मण सर , प्रायमरी प्राचार्या सौ . विद्या मॅडम , प्रि – प्रायमरी को - ऑडीनेटर सौ . योजना ठक्कर हे सर्वजण  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या