अमळनेर :- आज 19 नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत भारताच्या तृतीय आणि आज तागायत पहिल्याच महिला पंतप्रधान असलेल्या स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली .त्यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. एम. ताडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचीही जयंती साजरी केली. आणि जागतिक पुरुष दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपली शाळा जून 19 87 मध्ये कशाप्रकारे सुरू करण्यात आली. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या शाळेचे वटवृक्षात कशाप्रकारे रूपांतर झाले आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्तही विद्यार्थ्यांना सण 19 व्या शतकात झाशीची राणी झा राज्याच्या महाराणी होत्या. हिंदुस्थानात इसवी सन 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील झाशीची राणी लक्ष्मीबाई या अग्रणी सेनानी होत्या ,त्यांच्या शौर्याने क्रांतिकारकांची स्फुर्ती देवता म्हणून जनमानसात आ अढळ स्थान प्राप्त झाले आहे. तसेच घराचा खंबीर आधार असलेल्या प्रत्येक पुरुषाला जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना, आपले दुःख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजेच ' ' 'वडील' होय. अशा प्रकारे कार्यक्रमाचे महत्त्व सर्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून दिले सदर कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक संदीप पवार ,शिक्षक व्ही. डी .पाटील ,पी .एम. ठाकरे, डी. एस. माळी,एम. एस. सुशीर ,आर. डी. महाजन, ए.पी .जाधव, वाय .जे. पाटील, पी. ए .शेलकर, डी. एस. कारले ,तसेच शिक्षिका सी. डी .निकम, ए. यु. महाजन, बी. एस. चव्हाण, एस .एस .ते, पी.पी .पाटील, व्हि.डी.जाधव हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले
0 टिप्पण्या