अमळनेर: आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षणाचे आद्यप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक राजेंद्र निकुंभ, मनोहर महाजन, जितेंद्र चौधरी तसेच ज्येष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली देशपांडे यांनी, प्रास्ताविक विजय सुर्यवंशी यांनी केले. व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र निकुंभ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना थोर नेत्यांबाबत एक उपक्रम सुचविला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर महाजन यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांनी स्त्रींयासाठी दिलेल्या योगदान बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार सायली देशपांडे यांनी केले.
0 टिप्पण्या