अमळनेर :-आज 26 नोव्हेंबर 2022 रोजी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक ऍड.अशोक बाविस्कर यांनी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच प्रमुख अतिथी मुख्याध्यापक संदीप पवार यांनी एड.अशोक बाविस्कर यांचे गुलाब पुष्प ,स्नेह वस्त्र ,श्रीफळ देऊन स्वागत केले. भारतीय संविधान याविषयी एड.अशोक बाविस्कर यांनी सर्व उपस्थितांना आपले भारतीय संविधान आणि आपले जीवनमान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना विचार व्यक्त केले की, आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 19 49 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले. आणि आपल्या भारतीय लोकांसाठी 26 जानेवारी 19 50 रोजी लागू केले.तेव्हापासून आपण आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा दिवस साजरा करतो. आपले भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे .तसेच संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे .आपली न्यायपालिका ही एकेरी न्यायपालिका आहे .त्यात तालुका ,जिल्हा, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे .त्या माध्यमातून आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य अबाधित राखता येतात. आणि संविधानामुळेच आपल्याला सर्वांना शिक्षण हे कायद्याने मोफत आणि सक्तीचे करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आपले भारतीय संविधान हे जगात आदर्श आहे. भारतीय संविधानाची प्रास्ताविका हा संविधानाचा मूळ आत्मा आहे. म्हणून आपण आपल्या शालेय प्रार्थनेत त्याचा समावेश केलेला आहे.तद्नंतर संविधानाची प्रास्ताविका उपक्रमशील शिक्षक डी .ए .सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर सामूहिक वाचन करून केले. तसेच त्यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थ्यांचा पत्र लेखन या उपक्रमात पोस्ट कार्डवर संविधानाचे घोषवाक्य, प्रास्ताविका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पत्रात लिहून आपले नातेवाईक ,शिक्षक ,अधिकारी यांना पाठवण्यात आले. आणि सदरच्या दिवशी पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आले. त्यात शेकडो पुस्तके विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आणि वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर? वाणी भीम बुद्धाची, धर्मांतर के पचास वर्ष, दीपंकर धम्म काव्यांजली ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाजलेली गीते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र व विचार धन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सुविचारांचे पुस्तक तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांची विविध पुस्तके ,मुक्ता साळवे ,फातिमा शेख, आणि लहुजी वस्ताद यांचे माहितीपर पुस्तक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र, अशी विविध शेकडो पुस्तके प्रदर्शनात वाचनासाठी उपलब्ध होते. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षक व्हि. डी .पाटील ,डी .एस. माळी, वाय. जे .पाटील, ए. पी. जाधव, आर .डी .महाजन, पी. ए. शेलकर, पी. एम. ठाकरे, एम. एस. सुशीर, डी .एस .कारले ,तसेच शिक्षिका ए .यु .महाजन, व्हि. डी. जाधव, आर .एम. ताडे, एस.एस. तेले, पी .पी .पाटील, सी. डी. निकम, बी. एस. चव्हाण, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या