Subscribe Us

*अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील गरीब कुंटुंबातील मुलांने यश संपादन केले व त्यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत एसटीआय पदी निवड झाली.*

अमळनेर :-अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील राहुल अरुण पारधी यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या संयुक्त परीक्षेतुन उत्तुंग यश मिळवले आहे . राहुल पारधी यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत एसटीआय पदी निवड झाली आहे . राज्यात अनुसूचित जमाती मधून राहुल पारधी नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत . राहुल पारधी 2014 पासून जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सध्या रामानंद पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत . राहुल ' पारधी यांचे वडील निंभोरा येथे हातमजुरी करत असत . वडिलांच्या मेहनत बघत आणि तीच ऊर्जा घेत तथा कठोर मेहनत करत राहुल 2014 साली जळगाव जिल्हा पोलीस दलात भरती झाला . पोलीस दलात असूनही वेळात वेळ काढून राहुलने अभ्यास सुरू ठेवला व जुलै 2022 पासून सुरू झालेल्या संयुक्त परीक्षेत यश मिळत गेला .  दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला . व त्यात राहुलने एसटीआय म्हणून अनुसूचित जमाती संवर्गात राज्यात नवव्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले . राहुल पोलीस उपनिरीक्षक पदासाठी देखील पात्र झाला असून त्यात देखील स्थान मिळवू असा विश्वास राहुलने व्यक्त केला आहे . दरम्यान राहुलच्या या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या