Subscribe Us

*राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यासाठी सरकारने राज्यभरातील सर्व शाळा सॅटेलाइटने जोडण्याचा प्रयत्न .*

भिवंडी प्रतिनीधी :-   राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . त्यासाठी राज्यभरातील सर्व शाळा सॅटेलाइटने जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे . त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर होतील , अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली .. राज्यातील ' माझी ई - शाळा ' या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात शनिवारी काल्हेर जिल्हा परिषद शाळेतून केसरकर यांच्या हस्ते करण्यात आली . केसरकर म्हणाले की , शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाईल अॅपवर संग्रहित होणार आहेत . तशी टेक्नॉलॉजीही लवकरच विकसित करण्यात येणार आहे . अधिकाऱ्यांना झापले भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर आयएएस दर्जाचे अधिकारी हे . इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी चर्चा करीत होते . त्यामुळे केसरकर यांनी थांबवून अधिकाऱ्यांना तेथेच झापले . मंत्र्यांचे भाषण सुरू असताना आपसांत बोलणे चुकीचे आहे . मी एक वरिष्ठ मंत्री आहे . मी हे खपवून घेणार नाही . यापुढे लक्षात ठेवा , अशा शब्दात कानउघाडणी केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या