अमळनेर : भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. डॉ प्रा एल ए पाटील सर सायंटिस्ट नॅनोटेक्नॉलॉजी यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले त्यांनी विज्ञान,शैक्षणिक व सामाजिक या विविध विषयांच्या पैलूंवर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील ,सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील,प्राचार्य विकास चौधरी सर, प्राचार्य प्रकाश महाजन सर उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे पर्यवेक्षक म्हणून डी ए धनगर सर,संजय कृष्णा पाटील सर व संदीप गोसावी सर यांनी मोलाची भूमिका बजावली.विज्ञान प्रदर्शनात माहिती व तंत्रज्ञान, स्वास्थ्य व नीटनेटकेपणा, वाहतूक, वातावरणातील घटक,नाविन्यता,सौर ऊर्जा व पाणी वाचवा अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले शंभर हुन अधिक उपक्रम सादर केले होते. मान्यवर व पर्यवेक्षकानीं विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना भेट देत विद्यार्थ्यांकडून उपक्रमांची माहिती घेत , आपले अनमोल मार्गदर्शन केले . प्रदर्शनात विविध विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे उपक्रम सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढविली. शाळेच्या उपस्थित शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना लाभले विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व विविध स्तरांवरून इतर शाळांचे विद्यार्थी ,शिक्षक वर्ग व विज्ञान शिक्षक वर्ग यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य विकास चौधरी यांनी सर्व मान्यवरांचे परीक्षकांचे व उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या