अमळनेर प्रतिनीधी: अमळनेर येथील अंबऋषी टेकडीवर वृक्षप्रेमींनी झाडे लावली आहेत. अंबऋषी टेकडी आता जंगलच वाटू लागले आहे हे सर्व करण्यात टेकडी ग्रुपची मेहनत आहे. झाडे लावणे सोपी गोष्ट आहे परंतु झाडे जगवणे हे कठीण कार्य अंबऋषी टेकडी ग्रुप करत आहे. त्याचा मोठा आदर्श च आपण घ्यावयास पाहिजे. रोजच्या रोज झाडांना पाणी देणे झाडांची निगा राखणे या कामात सुरेश भाऊंच्या फार मोठा सिंहाच्या वाटा आहे. म्हणून त्यांना वरणेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे "वृक्षमित्र". पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व टेकडी ग्रुप सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले डॉक्टर अनिल वाणी नरेश कांबळे भदाणे बंधू सुनील भाई मंगळ ग्रहाचे बाविस्कर सर डॉक्टर राजेंद्र सोनार योगेश येवले आशिष चौधरी श्याम पुरकर लोटन पाटील हेमंत पाठक गौरव चौधरी इत्यादींनी सुरेश भाऊ चे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या