Subscribe Us

*दिवाळीची सुटी संपली व शाळा सुरू होऊन चार दिवस झाले , परंतु अजूनही शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ*

महिंदळे ता . भडगाव : दिवाळीची सुटी संपली . शाळा सुरू होऊन चार दिवस झाले , परंतु अजूनही शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठच आहे . कारण ग्रामीण भागात कपाशी वेचणी जोरात सुरू आहे . परिसरात शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत . मंजूर टंचाई व मजुरीचे दरही बऱ्यापैकी असल्यामुळे विद्यार्थी शेतात तर शिक्षक शाळेत , असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे . यावर्षी कापसाचा हंगाम बऱ्यापैकी असल्यामुळे उन्हाळी व पावसाळी कापूस एकाचवेळी फुटल्यामुळे मजूर मिळणे कठीण झा . परंतु विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी लागल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळू लागले होते . मजुरीचे दरही सकाळी आठ वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत २५० ते ३०० रुपये मिळत आहेत . काही तर नऊ ते दहा रुपये किलो दराने वेचणीला जात आहेत . त्यामुळे त्यांना दिवसाला ४०० ते ५०० रुपये मिळत आहेत . शेतकऱ्यांना लागले रब्बीचे वेध यावर्षी अतिपावसामुळे कपाशी पीक लवकर खाली झाले आहे . अति पावसामुळे विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकरी कपाशीची वेचणी करून शेती तयार करून मका , सूर्यफूल , हरभरा , गहू , दादर , ज्वारी , बाजरी लागवडीच्या तयारीत आहेत . जास्त उशीर झाला तर विहिरीचे पाणी पुरणार नाही .  त्यामुळे विद्यार्थ्यांकडून कापसाची वेचणी करून घेताना शेतकरी दिसत आहेत . थंडीच्या दिवसात पिकांना पाणी कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती तयार करण्यासाठी धावपळ सुरू आहे . शेती कामाचे दर चांगले मिळत असल्यामुळे व शेती कामांची धांदल सुरु असल्यामुळे शिक्षक शाळेत हजर , विद्यार्थी मात्र गैरहजर असे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे .3 ' शाळा सुरू होऊन चार दिवस झाले तरी अजूनही शाळेत पाहिजे तशी विद्यार्थी संख्या नाही . अध्यापन सुरू झाले आहे .मात्र विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे शिक्षकांना अडचण येत आहे . पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे . -ए . पी . बागूल , मुख्याध्यापक , माध्यमिक विद्यामंदिर , महिंदळे.

हागाईचा फटका सर्वसामान्यापासून तर सर्वच घटकांना बसत आहे . संसार चालवणे कठीण झाले आहे . त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च . त्यामुळे आता बऱ्यापैकी मजुरीचे दर मिळत असल्यामुळे मुलांना दिवाळीच्या सुटीत शाळा सुरू होऊनही कामाला घेऊन जावे लागत आहे . -ललिता पाटील , मजूर महिंदळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या