कुर्हे येथे विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन
अमळनेर-आपल्या कुर्हे गावात आतापर्यंत 52 लाखाची विकासकामे मंजूर झाली आहेत, जलजीवन मिशन योजना नवीन 29.86 लक्षची पाणीपुरवठा योजना मंजूर असून लवकरच तांत्रिक मंजुरी मिळेल, मी आमदार झाल्यापासून तुम्हाला पूर्ण वेळ भेटणारा आणि कार्यालयाला पूर्ण वेळ देणारा आमदार तुम्ही पहिला असेल जनतेची सेवा हेच आपले ब्रीदवाक्य असल्याची भावना आ.अनिल पाटील यांनी कुर्हे येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी व्यक्त केली.
आमदारांचे गावात जल्लोषात स्वागत झाले,यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की मतदारसंघात प्रत्येक गावाला काहींना काही काम देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि दिले पण आहेत,आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्वात पहिली चिंता होती ती पिकविम्याची यासाठी अहोरात्र प्रयत्न करून 500 कोटी रुपये संपुर्ण तालुक्यासाठी मंजूर करून सर्वसामान्य शेतकरीला दिलासा मिळवून दिला,संपुर्ण महाराष्ट्रात पीक विम्या मध्ये आपला तालुका 1 नंबर आहे हा अभिमान आपल्याला आहे.तरुण मुलांना आपल्याला काय सोई देऊ शकतो हे व्हिजन आपण घेऊन चालतोय, संपूर्ण तालुका हा आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे,माझी पहिली जबाबदारी म्हणून तालुक्यातील गुंड प्रवृत्ती संपविण्याचे काम मी केल आहे,यातून तालुक्यातील जनतेचे सुरक्षा रक्षण मी केलं आहे,विधानभवनात आक्रमक भूमिका मांडणारा तुमचा आमदार निश्चितपणे यापुढेही विकासकामात अग्रेसर राहील अशी ग्वाही शेवटी आमदारांनी दिली.
यावेळी सरपंच सुगन रमेश पाटील, इंदुबाई पांढुरंग पाटील, स्नेहा दिपक बि-हाडे, विजयसिंग दामु पाटील, निंबा पाटील (खेडी), ज्ञानेश्वर पाटील (मा.सरपंच टाकरखेडा), हरलाल वंजारी (खेडी), संदिप पाटील, गुलाबसिंग पाटील, भरतसिंग पाटील, महेंद्रसिंग पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, दोधु पाटील, प्रकाश पाटील, जितेंद्र पाटील, दिपक बि-हाडे, बिटू पाटील व ग्रामस्थ मंडळ कु-हे ब्रु उपस्थित होते.
यावेळी 2515 अंतर्गत काँक्रिटीकरण करणे रक्कम 15.00 लक्ष,मानव विकास अंतर्गत अंगणवाडी बांधणे रक्कम 8.50 लक्ष,जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणे (टी. एस.बाकी) रक्कम 29.86 लक्ष असे एकूण रक्कम 52.36 लक्षच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या