विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धा
धरणगाव: येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज संविधान दिनाच्या निमित्ताने गावातून अभूतपूर्व संविधान रॅली काढून गावभर संविधानाचा जागर केला. संविधानाच्या प्रती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधानाचे महत्व विशद करणारी घोषवाक्याची फलके हातात घेऊन संविधानाचा जयजयकार करत पी.आर.हायस्कूलमधून निघालेल्या या संविधान रॅली द्वारा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ, यू.एस.बोरसे, व्ही.एच.चौधरी, एनसीसी मेजर डी.एस.पाटील आणि शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने महामानवांना अभिवादन करून संविधानाचे पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. याप्रसंगी दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धैचे परीक्षण एस.के.बेलदार आणि श्रीमती सुरेखा तावडे यांनी केले. प्रास्ताविक बापू शिरसाठ यांनी केले. त्यांनी संविधानाची प्रास्ताविका विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. शिक्षक आर.एल.पाटील, बी.सी.कोळी, उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ यांची संविधानावर समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.आर.सूर्यवंशी आणि श्रीमती वंदना सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन जी.पी.चौधरी यांनी केले. रॅलीचे संयोजन बालभारती अभ्यास मंडळाचे माजी सदस्य बापू शिरसाठ यांनी केले. त्यासाठी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या