Subscribe Us

*स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस. इ. ]येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव लक्ष्य 2022-23 उत्साहात संपन्न.*

अमळनेर - दिनांक 19 व 20 नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई.] येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा लक्ष्य 2022-23 महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मार्गदर्शक श्री .डी डी पाटील ,श्री .जितेंद्र ठाकूर ,श्री .उमेश काटे, श्री. जयवंत ठाकूर, श्री .विनोद अमृतकर, श्री. संजय पाटील, श्री. सुनील वाघ , सौ.जास्मिन बरुचा ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सौ .आचल अग्रवाल सौ.सितीका अग्रवाल सौ. ममता अग्रवाल ,शाळेचे चेअरमन श्री. नीरज अग्रवाल तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत कुमार देवरे कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले. स्वागत सोहळा शाळेच्या मुख्य सांस्कृतिक  क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम शाळेच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर शाळेतील क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. झाले .त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च पास (पथसंचलन), मानवंदना  व मशाल पेटवून अतिथींचे स्वागत अगदी उत्कृष्टरित्या केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले.वार्षिक क्रीडा महोत्सवात पूर्व प्राथमिक ,प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व र्विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांचे हाऊसेसनुसार म्हणजेच अग्नी ,आकाश, पृथ्वी व त्रिशूल अशा चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते.पहिल्या दिवशी सामन्यात पूर्व प्राथमिक , इयत्ता पहिली व  दुसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.तर दुसऱ्या दिवशी क्रीडा सामन्यात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.तेव्हा कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी  क्रीडा सामन्यात=हर्डल रेस, झिगझ्याग रेस, सॅक रेस, इटिंग बिस्कीट, नबरिंग गेम्स,कलेक्टिंग ऑब्जेक्ट्स, सोलविंग पझल, कॉलेक्टिंग वॉटर विथ स्पोंज, कॅच द बॉल, टग ऑफ वॉर इत्यादी अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता.दुसऱ्या दिवशी  क्रीडा सामन्यात=100, 200 400 मिटर धावणे, सॅक रेस, भाला फेक, स्लो सायकलिंग, 50×4 v 100×4 मिटर रीले रेस अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळ खेळत होते अनेक चुरशीचे सामने झाले, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सामने बघण्यासाठी मैदानात गर्दी केली होती अगदी शिस्तबद्ध व उत्साहाने कार्यक्रम पार पडला. त्यावेळी संपूर्ण खेळ खेळून झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळेचे क्रीडांगण यामध्ये पार पडला. तेव्हा "अग्नी" या हाऊसने 'प्रथम क्रमांक' पटकाविला .यामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्ण ,कास्य व रोप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  वितरित करण्यात आले.प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंतकुमार देवरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या या अथक परिश्रम व मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक यशस्वीरित्या पार पडला. तसेच क्रीडाशिक्षक श्री. सुनील करंदीकर सौ .ममता पाटील , कु .हर्षदा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन परिश्रम व सहकार्य मोलाचे ठरले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत कुमार देवरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे ,शिक्षक गण सर्वांचे आभार मानले.सूत्रसंचालन सौ निशा पाटील, सौ राजश्री देसले, सौ नयना पाटील व श्री महेश जेठवा यांनी केले. राष्ट्रगाणं म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या