Subscribe Us

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत नानगाव तालुका दौंड येथील न्यू इंग्लिश स्कूल १९८९ बँचच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा ३३ वर्षानंतर मेहेर रिसॉर्ट खुटबाव ता. दौंड जि. पुणे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!

 दौंड प्रतिनिधी: सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅचच्या विद्यार्थ्यांना ग्रुप वर संघटित करून चर्चा घडवून आणून हा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन या विद्यार्थ्यांचे उत्तम आयोजन केले होते अनेक वर्षानंतर सर्व वर्ग बंधू भगिनी एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते याप्रसंगी मार्गशिक्षक मार्गदर्शक शिक्षक अंकुश  चौधरी सर सुरेश जाधव सर मुक्ताजी  बिडगर सर व रामभाऊ  वेताळ सर यांचा गौरव करण्यात आला. पुन्हा विद्यार्थी होऊन शालेय खेळ खेळले गेले दहावीच्या विद्यार्थ्यांसारखा आनंद घेतला लंगडी रस्सी केस सारख्या खेळामुळे तर खूप हसले भविष्यात सर्व मित्र-मैत्रिणींनी असाच स्नेहपूर्ण जिव्हाळा जपत एकमेकांना मदतीचा हात देत प्रगती साधावी असे आवाहन  महादेव शिदे व बाळासाहेब आडागळे सर यांनी केले.
 

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन बाळासाहेब आडागळे महादेव शिंदे व फुलचंद कांबळे ,लालासाहेब जाधव , धनेश मुथा, भाऊसाहेब दुरेकर यांनी केल्यामुळे पर जिल्ह्यात असलेल्या मुली लग्नानंतर प्रथमच एकत्र आल्यामुळे गहिवरून गेल्या होत्या. आजच्या आनंदामुळे आमचे आयुष्य एक वर्षाने वाढले दरवर्षी एकत्र येऊ या असे मत सविता रणदिवे, राणी झंवर ने व्यक्त केले. याप्रसंगी किशोर शेलार रवींद्र इंदलकर शोभा खळदकर, सविता रणदिवे  संगीता लव्हे राणी झंवर  संगीता शिंदे रामदास शितोळे आशा दरेकर राजेंद्र पाटोळे मुबारक पठाण भाऊसाहेब दरेकर पांडुरंग खळदकर, सुदाम खळदकर, नामदेव फडके राजू पठाण मनोहर मगर रेखा भागवत संजय गवळी सोपान शेंडगे आप्पा काळे सतीश कोंडे दीपक खळदकर,बाळकृष्ण गुंड दत्तात्रेय गुंड सुनील गुंड दीपक शिंदे बाळासाहेब अवसरे सत्यवान हिवरे, महादेव बारवकर  राजू साळूंके असे अनेक विद्यार्थी विठ्ठल भोसले लहान मुलासारखे आनंद घेत होते जाताना फक्त आठवणी अश्रू नये ज्ञानी निरोप देऊन गेल्या पुन्हा एकत्र येऊ या आशेने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या