अमळनेर प्रतिनीधी: मराठा सेवासंघ आयोजित NEET/JEE/CET भव्य मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले. यासाठी प्रमुख मार्गर्शक म्हणून लातूर पॅटर्नचे सुप्रसिद्ध शिक्षक प्रा. श्री. जितेंद्र चव्हाण सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. राहुल बाविस्कर, अमळनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव, खान्देश शिक्षण मंडळ संचालक डॉ. अनिल शिंदे, मराठा समाज अध्यक्ष श्री. जयवंतराव पाटील, मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. श्याम पाटील, श्री. कैलास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती वसुंधरा लांडगे, संत गाडगे महाराज प्रबोधिनीच्या प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील उपस्थित होते. यावेळी वक्त्यांच्या भाषणाआधी अभियांत्रिकी व मेडिकल मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्राला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यानंतर हि वर्षभर असे अनेक कार्यक्रम मराठा सेवासंघाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष श्री. रामेश्वर भदाणे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री प्रेमराज पवार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. अशोक पाटील व बापूराव ठाकरे यांनी करून दिला तर आभार मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष डॉ. कुणाल पवार सर यांनी मानले.
0 टिप्पण्या