Subscribe Us

अमळनेर व मारवड पोलीस स्टेशनला नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची भेट!


अमळनेर प्रतिनीधी: नूतन पोलीस अधीक्षक एम . राजकुमार यांनी अमळनेर व मारवड पोलीस स्टेशनला भेटी देऊन गुन्हे आणि कामकाजाचा आढावा घेतला तसेच शहर पोलीस स्टेशनसाठी जुनी पोलीस वसाहत जागेची पाहणी केली . पोलीस अधीक्षक एम . राजकुमार यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन लॉकअप , आरोपींसाठी असलेले स्वच्छतागृह , गुन्ह्यांची निर्गती , तपास , अन्वेषण , शहर व तालुक्यातील हिस्ट्री शिटर , पोलिसांच्या कामकाजाची पाहणी केली .
           शस्त्रागार , परिसरातील स्वच्छता , जप्त माल याची खात्री करून . काही महिला फिर्यादी यांच्याकडे पोलिसांच्या वागणुकीची चौकशी केली .  मुडी शिक्षण संस्था प्रकरणाचीही त्यांनी दखल घेतली . सामान्य नागरिकांशी चर्चा करून शहरातील कॅमेऱ्याच्या योजनेची पाहणी करून समाधान व्यक्त केले . मारवड पोलीस स्टेशनलाही त्यांनी भेटी देऊन कर्मचारी संख्या , हद्दीतील गावे , संवेदनशील माहिती , गुन्हेगारांची माहिती घेतली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या