अमळनेर प्रतिनीधी: जळोद गावात दिवाळी निमित्त एक दिया देश के जवानो के नाम हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व तरुणांनीं घरून एक दिवा आणून जय हिंद नाव व भारत माता की जय घोषणा बाजी ही केली .यात तरुणामध्ये देशप्रेम व एकता दिसुन आली. हिंदू व मुस्लीम मुलानी एकत्र येऊन दिवाळी साजरा करावी.
या कार्यक्रमाला गावातील तरुण मंडळी व ज्येष्ठ मंडळी या सर्वाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आली होती. तरुणानी दिवाळी दिवशी एक मोलाचा संदेश सर्वाना दिला. जवान आपल्या परीवारा पासुन व गावापासुन लांब असतो. देशाची सेवा बजावत असतो. तरी आपले कर्तव्य आहे. त्याच्यासाठि आपण वेळ काढावा. कार्यक्रम खुप उत्साहात व आनंदात पार पडला. शेवटी सर्वांनी दहा मिनीटे मौन पाळुन जवानाकरिता प्रार्थना केली. या कार्यक्रमातून सर्वांना चांगला संदेश जाईल.
0 टिप्पण्या