अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यात सुरू असलेल्या “ करियर संवाद वारी - थेट आपल्या दारी " या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला . शनिवार ( ता .22 ) पासून सुरु असलेल्या करियर संवाद वारीचा समारोप मंगळवारी ( ता .25 ) मारवड ( ता . अमळनेर ) येथे करण्यात आला . उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व विविध विकास मंचतर्फे आयोजित या उपक्रमात प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन मिळाले . ऐन दिवाळीत तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शनाची मेजवानी ठरली आहे . या उपक्रमामुळे निश्चितच तालुक्यासह खानदेशात प्रशासनात अधिकाऱ्यांचा सह नोकरदारांचा टक्का वाढणार आहे.
मारवड येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी जवखेडे येथील सुपुत्र व सध्या आयएसएस नरेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना वडिलांचे छत्र हरपल्यानंतर लहान भावाने घराचा भार उचलत यशात मोलाचा वाटा उचलला व या प्रवासात मित्रपरिवाराने कसे सहकार्य केले याची संघर्षकहाणी कथन केली . नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार यांनी सांगितले की , मारवड हे गाव अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे . आयआरएस संदिपकुमार साळुंखे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या प्रेरणेने बहुसंख्य युवक अधिकारी पदावर कार्यरत आहेत . कोरोनानंतर दोन- तीन वर्षात आलेली मरगळ झटकून आगामी काळात विविध स्पर्धा परिक्षेत खान्देशी अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा या उद्देशाने करीयर संवाद वारीचे आयोजन केले असल्याचे सांगितले . स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षांमध्ये सुमारे 23 हजार पेक्षा जास्त पदे असतात.
प्रत्येकाने संकुचित वलयातून बाहेर पडले पाहिजे . बिकट परिस्थितीतच माणसाला यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचवते . पोलीस भरती वर्ग 3 ची भरती या परीक्षा आता एमपीएससी मार्फत होणार आहेत . उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी मारवड हे तालुक्यातील स्पर्धा परीक्षार्थी व अधिकाऱ्यांसाठी पंढरी असून याच ठिकाणी वारीचा समारोप करण्याची यामागची कपिल पवार यांची संकल्पना असल्याचे सांगत कौतुक केले . युनियन बँकेचे मॅनेजर मयूर पाटील यांनी बँकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शन करताना बँकिंग हे करीयर करण्यासाठी योग्य क्षेत्र असून त्या क्षेत्रातील सोयी , सुविधा व संधी समजावून सांगितल्या . शिक्षक भैय्या पाटील यांनी टीईटी परीक्षा , फॉरेन्सिक इन्स्पेक्टर राहुल पाटील व डॉ चेतन सनेर यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले .
आयएसएस नरेश पाटील यांच्या सह त्याला कनिष्ठ बंधू सुनील पाटील यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी ए धनगर व एल जे चौधरी यांनी तर आभार व्ही ए पवार व उपअभियंता विजय भदाने यांनी व्यक्त केले . यावेळी मारवड व परिसर विकास मंचतर्फे स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी रोख स्वरुपात मदत मान्यवरांच्या हाती सुपूर्त करण्यात आली .
यांनी केले मार्गदर्शन नागपूरचे आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार , जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार , आयएसएस तथा सहाय्यक संचालक नरेश पाटील , पीडब्लूडी उपअभियंता विजय भदाने , युनियन बँक सिनियर मॅनेजर मयूर पाटील , नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील , ए . पी . आय . जितेंद्र पाटील , एपीआय गोपीचंद नेरकर , आर टी ओ स्वप्नील वानखेडे , एसटीआय संदीप पाटील , सरकारी लेखापरीक्षक प्रशांत पाटील , फॉरनसिक इन्स्पेक्टर राहुल पाटील , केंद्रीय सुरक्षा बल शरद खैरनार , जळगाव पोलीस चंदन पाटील , स्पर्धा मार्गदर्शक प्रा . डॉ . एस ओ माळी , स्पर्धा मार्गदर्शक डी ए धनगर , स्पर्धा मार्गदर्शक व्ही ए पवार , स्पर्धा मार्गदर्शक उमेश काटे , स्पर्धा मार्गदर्शक भैय्या पाटील , दिवाकर पाटील यांनी गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . गोंदिया च्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले .
तालुक्यातील विविध विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसह जवखेडा येथे ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील , डॉ दिनेश पाटील , सुरेश पाटील यांच्या सह सरपंच , उपसरपंच , कन्हेरे येथे एपीआय गोपीचंद पाटील , मुख्याध्यापक आर बी पाटील , हेमंत भोसले , प्राथमिक शिक्षक विनोद पाटील , मंगरुळ येथे प्रा . संदीप पाटील , राजेंद्र पाटील , अमोल पाटील , समाधान पारधी , मनोहर नेरकर , चंद्रकांत पाटील , प्रेमराज पवार , पातोंडा येथे प्रा भूषण बिरारी सह पातोंडा विकास मंचचे पदाधिकारी , खेडी प्र.ज्ञ- प्रा श्याम पवार , प्रा कैलास पाटील , भरवस येथे किशोर पाटील , संजय पाटील , विजय पाटील , राजेंद्र पाटील , ज्ञानेश्वर पाटील , मिलिंद पाटील , सबगव्हानचे नरेंद्र पाटील , आर बी पाटील , साने नगर ( अमळनेर ) येथे प्राथमिक शिक्षक प्रवीण पाटील , संस्थाचालक महेश पाटील , सुभेदार श्रीराम पाटील , माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिहाडे , माध्यमिक शिक्षक निरंजन पेंढारे , करणखेडे येथे भैय्यासाहेब पाटील , एसटीआय संदीप पाटील , लेखा परीक्षक प्रशांत पाटील , मारवड येथे गोकुळ साळुंखे , एल जे चौधरी , राजेंद्र सूर्य महेश साळुंखे , राकेश गुरव , गणेश पाटील , गोकुळ साळुंखे , एल जे चौधरी , राजेंद्र सूर्यवंशी , महेश साळुंखे , राकेश गुरव , गणेश पाटील , प्रदीप चौधरी , हर्षल साळुंखे , वैभव साळुंखे यांच्यासह मारवड विकास मंचचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले .
0 टिप्पण्या