अमळनेर: लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्र लष्करे व प्रमुख पाहुणे राजेंद्र निकुंभ यांनी प्रतिमेचे पूजन केले.
त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री जे.के चौधरी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार सौ आशा सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या