Subscribe Us

अमळनेरात रंगणार भारत केसरी व महाराष्ट्र केसरी महाकुस्ती!

अमळनेर प्रतिनिधी: अनेक वर्षांनंतर अमळनेर शहरात खड्डा जीन मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी भारत केसरी पैलवान भारत मदने ( बारामती ) व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक ( सोलापूर ) यांच्यात महाकुस्तीचा सामना रंगणार आहे . या सामन्यासाठी अडीच लाखांचे बक्षीस जाहीर

करण्यात आले आहे . अमळनेर तालीम संघाने पुन्हा भरारी घेतली आहे . तरुणांमध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून ७ नोव्हेंबर रोजी मोठमोठ्या पैलवानाच्या कुस्तीच्या लढती आयोजित केल्या आहेत .

              भारत मदने व बाला रफिक यांच्यासह बबलू पैलवान ( चाळीसगाव ) व शाकिरनूर पैलवान ( मेरठ ) , हितेश पाटील ( पाचोरा ) व सैफअली पंजाबी ( मालेगाव ) , निजामअली ( अमळनेर ) व करण देवरे ( चाळीसगाव ) , सोपान माळी ( चाळीसगाव ) व शादाब पैलवान ( भुसावळ ) , पवन शिंपी ( अमळनेर ) व अज्जू पैलवान ( कासोदा ) , मोईनअली ( अहमदनगर ) व सोनू पैलवान ( अमळनेर ) , अमन पैलवान ( भुसावळ ) व योगराज चौधरी ( अमळनेर ) , ऋषिकेश पाटील ( अमळनेर ) व समाधान पाटील ( तरवाडे ) , फरहान पैलवान ( रावेर ) व बंटी शिंदे ( जळगाव ) यांच्यातही कुस्तीचे सामने रंगणार आहेत . स्पर्धा यशस्वीतेसाठी अमळनेर तालीम संघाचे शब्बीर पैलवान , माजी नगरसेवक संजय पाटील , संजय भिला पाटील , माजी नगरसेवक प्रताप शिंपी , महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पाटील ,  विनोद निकम , तालुका कुस्तीगीर संघाचे बाळू पाटील , भरत पवार परिश्रम घेत आहेत . या कुस्त्यांच्या महादंगलीसाठी पंच म्हणून जळगाव जिल्हा कुस्तीगीर अध्यक्ष सुनील देशमुख , मल्लविद्या कुस्तीगीर अध्यक्ष अण्णा कोळी , आदिल पैलवान , राजू पाटील काम पाहतील .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या