अमळनेर: महाराष्ट्र राज्य कला क्रीडा दुत फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष सुनिल वाघ यांचा महाराष्ट्र राज्य क्रीडा रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जालना येथील देवगिरी इ. मेडियम स्कुल हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाला. यात जी.एस.हायस्कुलचे क्रीडाशिक्षक, राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त व अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष सुनिल वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातुन एकुण ८ शिक्षकांची निवड यात करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक विभागातील ते एकमेव होते. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, प्रमाणपत्र, मानाचा फेटा, शाल,बुके देऊन सन्मान करण्यात आला. अमळनेर येथे १३ वर्षापासुन क्रीडा क्षेत्रात अहोरात्र परिश्रम घेऊन खेळाडू घडविण्याचे कार्य ते करीत आहे, त्यांच्या मार्गदर्शक खाली अनेक खेळाडूनी राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांचा हा २८ वा पुरस्कार आहे, हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी, कार्योपाध्यक्ष व शालेय समिती चेअरमन योगेश दादा मुंदडे, समन्वय समिती चेअरमन डॉ. अनिल शिदे, संचालक प्रदीप अग्रवाल, संचालक डॉ. संदेश गुजराथी, संचालक निरज अग्रवाल, संचालक विनोद भैय्या पाटील, संचालक श्री. कल्याणबापु पाटील, चिटणीस डॉ. प्रा. ए. बी. कोचर, सस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त वसुंधरा लाडगे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक डी. एच. ठाकुर, पर्यवेक्षक आर. एल. माळी, बी. एस. पाटील, निकम, भदाणे व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या