Subscribe Us

के.डी.गायकवाड हायस्कुल,अमळनेर येथे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडीतुन पटवले निवडणूकीचे महत्त्व! k.d.gaikwad highschool

अमळनेर (पैलाड) - येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,अमळनेर येथे लोकशाही पध्दतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक झाली.पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळ सदस्याची निवड केली.निवड करतांना उमेदवाराच्या शाळेतील विविध उपक्रमातील सहभाग,शैक्षणिक प्रगती व त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विचार करण्यात आला.शाळेतील आठवी ते नव्वीचे उमेदवार विजयी झाले.विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.

Head Girl - पुजा राजेंद्र भोई 9 वी

Head Boy - दर्शन रमेश मोरे 9 वी

Finance Secretary - दिव्या रमेश भोई 9 वी

Culture Secretary - अर्चना कैलास भोई 8 वी

Sports Person - कोमल प्रकाश भोई 9 वी हे विद्यार्थी विजयी झाले.

विद्यार्थ्यांना निवडणूकीचे महत्त्व,मतदानाचा हक्क,लोकशाही प्रक्रिया समजावी या उद्देशाने निवडणूक घेण्यात आली.

या निवडणूक साठी शाळेचे मुख्यध्यापक ए.व्ही.नेतकर,संस्थेचे सरचिटणिस डी.डी.पाटील यांनी निर्णय अधिकारी व शाळेचे पर्यवेक्षक डी.एस.पाटील व एम.आर.सोनवणे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.तसेच एम.पी.पाटील,पुनम पारधी,हर्षल पाटील यांनी संपुर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली.यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या