Subscribe Us

आदर्श सिंधी हायस्कूल मध्ये हिंदी दिवसा निमित्त कविता वाचन /गायन स्पर्धा संपन्न!


जळगाव प्रतिनिधी:  झुलेलाल सिंधी एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श सिंधी हायस्कूल मध्ये हिंदी दिवसाचे औचित्य साधून आंतरशालेय कविता वाचन / गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात प्रतिभा माध्यमिक, मिल्लत हायस्कूल, संत हरदासराम हिंदी हायस्कूल, सेंट टेरेसा स्कूल, या. दै. पाटील, विद्या इंग्लिश मिडियम स्कूल, इकरा ऊर्दु हायस्कूल, श्रीराम माध्यमिक स्कूल इ. शाळांनी सहभाग नोंदविला.

प्रथम-जोफीन फातेमा शेख अनीस ( मिल्लत स्कूल, जळगांव), द्वितीय-पलक मनोजकुमार हुंदानी (आदर्श सिंधी हायस्कूल, जळगांव ), तृतिय-मिस्बाह कौसर शै. मोइनोदिन (मिल्लत स्कूल, जळगांव.), उत्तेजनार्थ-सुशी किशन जांगीड ( विद्या इंग्लिश मिडियम स्कूल, जळगांव ), उत्तेजनार्थ पायल रमेश सैनी (आदर्श सिंधी हायस्कूल, जळगांव )

या विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे गायन करुन परिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे मने जिकून यश संपादन केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून निवृत्त शिक्षक श्री. दयानंद विसराणी व श्री. तुलसीदास मोतीरामाणी हे होते स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार आडवानी, उपाध्यक्ष श्री. रमेशलाल काटरिया सचित श्री वासूदेव तलरेजा, कोषाध्यक्ष श्री. सुशिल वालेचा तथा श्री. विजय हाँसवानी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मती चिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र व उपस्थित शिक्षकांना पुष्प देवेन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मनोहर तेजवानी यांनी केले तर आभार, शाळेच्या मुख्याध्यापक श्री. बॉलचंद काँठपाल यानी मानले, कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिक्षम घेतले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या