Subscribe Us

मा.शिक्षण विस्तार अधिकारी सौ.वाडीले मॅडम आणि केंद्रप्रमुख शरद सोनवणे यांची पट-पडताळणी निमित्त लोकमान्य विद्यालयाला सदिच्छा भेट! 


अमळनेर: आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मा.शिक्षण विस्तार अधिकारी सौ.वाडीले मॅडम आणि केंद्रप्रमुख श्री.शरद सोनवणे यांनी पडताळणीसाठी लोकमान्य विद्यालयाला भेट दिली असता, विद्यालयाचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक श्री.रवींद्र लष्करे सर व शिक्षक प्रतिनिधी श्री.मनोहर महाजन सर यांच्या हस्ते त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. 
यावेळी केंद्रप्रमुख श्रीशरद सोनवणे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या