भारतीय हवामान खाते यांनी दिनांक 18/09/2022 रोजी दक्षता घेणेबाबत दिलेल्या इशा-यानुसार पुढील आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली असल्याने तसेच दिनांक 19/09/2022 ते दिनांक 23/09/2022 रोजी ताशी 30 ते 40 किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असुन नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे घरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रिसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. सदर परतीचा पाऊस ताशी 30 ते 40 किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसादरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे तसेच प्रसंगी झाडाखाली, विजवाहीनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबु नये असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना शासनातर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या