नंदुरबार प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत नेमणूक झालेल्या सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अंशदायी पेंशन योजना लागू करुन तसेच सन 1982 ची जुनी पेंशन योजना रद्द करुन शासनाने मोठा अन्याय केलेला आहे. सदर योजनेला विरोध हा महाराष्ट्रातील विविध संघटना वेळोवेळी करत आल्या होत्या. सदर योजना लागू झाल्यापासून सातत्याने व तिव्रतेने विरोध केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मागदर्शन व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटन च्या आवाहनानुसार नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 21 रोजी जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत सर्व विभागाच्या सर्व संघटना यांना सोबत घेवुन जनजागृती निर्माण करणेकरीता बाईक रॅलीत समाविष्ट झाल्या. सदर बाईक रॅली सकाळी 09 वा. नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा नगरपालिका-अंधारे स्टॉप - छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह - धुळे चौफुली - नवापूर चौफुली अशा मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे शांततेत पोहोचली. सदर रॅलीचे तेथे सभेत रुपांतर झाले. हेमंत देवकर यांनी रॅलीचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. संदिप रायते यांनी जुनी पेंशन कशी मिळवता येइल यावर मार्गदर्शन केले. शासनाचे कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या तसेच जिव्हाळ्याच्या जुनी पेंशन योजना लागू करणे बाबतच्या मागणी कडे लक्ष वेधणेआहे हे स्पष्ट केले. प्रभाकर नांद्रे यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. तसेच सदर आंदोलन हे जुनी पेंशनकरीता छेडलेल्या व्यापक आंदोलनाचा पहिला टप्पा आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू न केल्यास भविष्यात यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा कर्मचारी संघटनेचा मानस आहे. आजच्या बाईक रॅलीत राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय संघटना, नंदुरबार सोबत 42 संघटना सामिल झालेल्या होत्या. अशी माहिती राहुल पवार यांनी दिली.
0 टिप्पण्या