अमळनेर: बाबासाहेब के.नारखेडे विद्यालयाच्या वतीने दरवर्षी बाबासाहेब के.नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातील शिक्षकांसाठी असलेल्या कथालेखन स्पर्धेत लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संचलित लोकमान्य विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री जे.के.चौधरी यांच्या "अघटीत" या कथेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी भुसावळ येथे श्री जे.के.चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करून यथोचित सत्कार करण्यात आला. या यशासाठी लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रविंद्र लष्करे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री जे.के.चौधरी यांचे अभिनंदन केले आहे त्याच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या