Subscribe Us

देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न!


अमळनेर: 1949 मध्ये संविधान सभेने हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले होते या दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. यासाठी काका कालेलकर, मैथलीशरण गुप्त, सेठ गोविंददास यासारखे लेखकांनी प्रयत्न केले. 14 सप्टेंबर 1949 रोजी सीम्हा यांच्या 50 व्या जयंतीदिनी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला व 1953 पासून हिंदी दिवस साजरा करण्यात संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो असे अध्यक्ष भाषणात महात्मा फुले हायस्कूलचे हिंदी शिक्षक आय. आर. महाजन बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन होते, तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक अनिल महाजन, स्काऊट शिक्षक एस. के महाजन, एच.ओ माळी क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, लिपिक एन.जी देशमुख होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत देवगांव देवळी हायस्कूल मधील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर केले. शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला.

प्रथम- हर्षला पाटील दहावी

द्वितीय- गणेश तडवी इयत्ता नववी

तृतीय- भाग्यश्री पाटील नववी

उत्तेजनार्थ- श्वेता बैसाणे नववी

जयश्री पाटील नववी

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षीस देण्यात आली. परीक्षक म्हणून क्रिडाशिक्षक अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. वकृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना हिंदी शिक्षक आय.आर.महाजनयांच्याकडून बक्षीस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद सोनटक्के यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या