जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मारवड येथील उपशिक्षक श्री दिनेश रमेश मोरे यांना सन 2021_ 22 चा जळगाव जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजे संभाजी नाट्यगृह जळगाव येथे माननीय नामदार श्री.भाऊसो गुलाबराव पाटील व माननीय नामदार श्री दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळेस माननीय गट गटशिक्षणाधिकारी साहेब श्रीमती ताईसो उर्मिला चव्हाण मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी ताईसो श्रीमती कल्पना वाडीले मॅडम , दादासो श्री अशोक सोनवणे सर केंद्र प्रमुख मारवड शिक्षक मित्रपरिवार उपस्थित होते.
श्री दिनेश रमेश मोरे उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक मुलीची शाळा मारवड यास सन 2021 - 22 या वर्षाचा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य १)2015/16 आणि 2016/17 मध्ये तीन विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय निवड तसेच एक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये निवड २)जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक पायाभूत सुविधा होण्यासाठी लोकसभागातून आज अखेर *12 लाख 36 हजार रुपये जमा केले* . या लोकसहभागातून डिजिटल स्मार्ट क्लास, संगणक ,ABL स्कूल, गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक साहित्य, शालेय वर्ग दुरुस्ती , ज्ञानरचनावाद रेखाटन कामे केली 3) *सन 2017/18 मध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लोकसहभाग जमवल्याबद्दल जिल्हा* परिषद जळगाव यांच्याकडून सन्मानित करण्यात आले . ४)विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. 5) कोरोना काळातही जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मारवड येथे *एक लाख 78 हजार रूपये* जमा करून शाळेत परिपाठ मंच, Hand Wash स्टेशन तयार केले . तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाध्याय पुस्तिका , उजळणी चे पुस्तके तसेच अभ्यासाचे झेरॉक्स प्रतींचे वाटप केले. 6) या वर्षी v school app मध्ये तालुक्यात तीनही विद्यार्थी टॉपर म्हणून निवड झाली.
0 टिप्पण्या