रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. किर्तीकुमार कोठारी
सचिवपदी रो.ताहा बुकवाला
अमळनेर – अमळनेर नगरीत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तसेच नावारूपास आलेल्या रोटरी क्लब अमळनेरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २४जुलै रोजी बन्सीलाल पॅलेस येथे थाटात संपन्न झाला.
अमळनेर येथील रोटरी क्लबचे नूतन पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहन सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.निलेश चव्हाण, संभाजीनगर, सह-प्रांतपाल रो.नितीन अहिराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच कार्यक्रमाला जिल्हा सह सचिव रो. योगेश भोळे, रोटरी क्लब चोपडा, रोटरी क्लब जळगाव वेस्ट येथील अनेक रोटेरियन व जिल्ह्यातील इतर क्लब चे माझी अध्यक्ष उपस्थित होते. नूतन अध्यक्ष म्हणून रो.किर्तीकुमार कोठारी, तर सचिव म्हणून रो.ताहा बुकवाला यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. मावळते अध्यक्ष रो.वृषभ पारख व सचिव रो.प्रतीक जैन यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या विविध प्रोजेक्टची वर्षभरातील माहिती दिली, मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा तसेच नवीन पदाधिकारी निवड बैठकीत यावेळी सर्वांचे स्वागत केले, अती गरीब परिस्थीत इ.10 विला 97.80% मार्क मिळून तालुक्यात पहिली आल्याबदल कु.श्रद्धा संजय सूर्यवंशी, डि.आर.कन्या शाळा, अमळनेर तिचा सत्कार करण्यात आला व तिला संगणक व धूर्विरहित चुला भेट वस्तू देण्यात आली.
रो.प्रतीक जैन म्हणाले, मला संस्थेचे शाखा सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. थोडे दडपण होते. मात्र, सर्वांना समवेत घेत चांगले काम करता आले याचे समाधान आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष रो. किर्तीकुमार कोठारी यांनी येणाऱ्या वर्षात ऑथोप्रेडीक लॅबोरेटरी, वृक्षारोपण आपल्या दारी, रोटरी उत्सव, एड्स प्रोटीन किट, इन्व्हरमेंट ऍम्बुलन्स, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, बाल व माता संगोपन सहाय्यक प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील, असे सांगितले. सह-प्रांतपाल रो.नितीन अहिराव यांनी प्रांतपाल 3030 (नाशिक ते चंद्रपूर) रो. डॉ. आनंद झुनझुनवाला यांचे मनोगत वाचून दाखविले. प्रमुख पाहुणे श्री.निलेश चव्हाण यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले व ती ही एक दिवाळी होती यांची सुप्रसिद्ध मराठी कविता यांनी वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.अजय रोडगे, डॉ.प्रितम जैन यांनी केले कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सर्व सदस्य व परिवार, लायन क्लब सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन सचिव रो.ताहा बुकवाला यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचा शेवट हा वसुंधरा लांडगे यांनी पसायदान सादर करून केला.असे रोटरी क्लबचे पी.आर.ओ रो. मकसूद बोहरी, रो.आशिष चौधरी यांनी प्रसिद्धीस दिले. सर्व सभासदाने सहकार्य केले.
0 टिप्पण्या