Subscribe Us

10 वी निकाल या तारखेला!- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


12 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतिक्षा (SSC Result 2022) आहे ती 10 वी च्या निकालाची. निकालाबाबत 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि निकालाविषयी कुतूहलही आहे. 10 वी निकालानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाचा काळ सुरु होतो. अनेक लहान मोठे आयुष्याला वळण देणारे निर्णय विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात. त्यामुळे 10 निकालाची उत्सुकता आणि टेंशनही विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळत आहे.

लवकरच निकाल!


आता या परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ येत चाललीय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटल्यानुसार 15 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल अगोदरच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी त्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. आता आपलं काय होईल, या टेन्शननं विद्यार्थ्यांना ग्रासलं आहे.

असा पहा निकाल!


निकालाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पुढच्या काही तासांत दहावीचा निकाल जाहीर झालेला असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाईन मिळालेल्या असणार आहेत.
या काही वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी SSC हा पर्याय निवडावा. त्यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव हे पर्याय विचारले जातात. ते भरल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचा निकाल पाहता येणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या