Subscribe Us

Shivsena : एकनाथ शिंदेनी ठेवले 'हे' तीन प्रस्ताव, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट


एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीनंतर शिंदेंनी तीन प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे शिवसेना (shivsena) नेते सुनील बागुल यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्ही शिवसैनिक सरसेनापती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. काय म्हणाले सुनील बागुल?

शिंदे यांनी तीन प्रस्ताव ठेवले

सुनील बागुल म्हणाले की, शिंदे आणि नार्वेकर यांची बैठक नुकतीच पार पडली असून शिंदे यांनी तीन प्रस्ताव ठेवले आहेत. यामध्ये गटनेतेपद पुन्हा माझ्याकडे द्यावे, काँग्रेस- राष्ट्रवादी (National Congress Party) सोबत युती तोडावी, तसेच भाजप सोबत युती करावी' असे महत्वाचे तीन त्यांनी दिल्याने बागुल म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसैनिक एकत्र आले असून शक्तिप्रदर्शन करीत आहेत. शालिमार येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र झाले होते. तत्पूर्वी मध्यवर्ती कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील संघटनांची बैठक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत आम्ही सर्व शिवसेनेच्या पाठीशी असल्याची घोषणाबाजी करण्यात आली. 'शिवसेना जिंदाबाद, ताकद कोणाची शिवसेनेचीच', अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात?

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना (uddhav thackeray) सांगितलं असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या