Subscribe Us

जिल्ह्यातील शिक्षकांसाठी उद्बोधन कार्यशाळांचे आयोजन


 
जळगाव प्रतिनिधी: 
शिक्षण विभाग जि.प.जळगाव आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे निर्देशानुसार डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनात निपुण भारत अंतर्गत *"मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची"(FLN)* प्रभावी अंमलबजावणी व्हावी,जिल्ह्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, बालकांचा अध्ययन स्तर उंचावणे,इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्तींसह प्रभावी अध्यापन,दैनंदिन अध्यापनातून शैक्षणिक साहित्याचा परिणामकारक वापर,बालकांचे शारीरिक आरोग्य व मानसिक विकास,जिल्ह्यातील शिक्षकांची क्षमता बांधणी करणे.यातून जिल्ह्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचे संवर्धन व्हावे,यांकरीता दिनांक ०७ जून २०२२ रोजी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय उद्बोधन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील अध्यापिका विद्यालय,ला.ना.सार्वजनिक विद्यालय,नंदिनीबाई मुलींचे विद्यालय,अशा तीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये जळगाव येथे या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
   मराठी भाषा,गणित,इंग्रजी या प्रत्येक विषयासाठी प्रत्येक बीटमधून दोन असे जिल्ह्यातील एकुण ६० बीटमधून एकुण ३६० प्रशिक्षणार्थीं सदरील जिल्हास्तरीय उदबोधन कार्यशाळेत सहभागी झाले होते.
  सदरील कार्यशाळांपैकी मराठी भाषा विषयासाठी कार्यशाळा अध्यापिका विद्यालय जळगाव येथे भाषा विभाग प्रशिक्षण प्रमुख डॉ.दशरथ साळुंखे यांच्यासह किशोर पाटील,नरेंद्र सोनवणे,संदिप पाटील,गणेश राऊत यांच्यामार्गदर्शनात कार्यशाळा संपन्न झाली.
   गणित विषयासाठी ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गणित विभाग प्रमुख श्रीमती जयश्री पाटील यांचेसह अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे,शैलेश पाटील,चंद्रकांत देसले,भटू पाटील यांचे मार्गदर्शनात कार्यशाळा संपन्न झाली.
   तसेच नंदिनीबाई मुलींचे विद्यालयात इंग्रजी विषयासाठी विभाग प्रमुख डॉ.विद्या बोरसे, वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती प्रतिभा भावसार,अरुण भांगरे,श्यामकांत रुले,प्रविण पाटील,सुरेश पाटील आदींच्या मार्गदर्शनात कार्यशाळा पार पडली.
  जिल्हास्तरीय कार्यशाळांच्या आयोजनानंतर लवकरच प्रत्येक तालुक्यांतील बीटस्तरीय उदबोधन वर्गांचे आयोजन सर्व  तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांचे संनियंत्रणात केले जाणार आहे.
   सदरील कार्यशाळांच्या यशस्वीतेसाठी व नाव नोंदणीसाठी स्थानिक शाळांतील कर्मचारी,डाएटचे कर्मचारी,व तालुका साधनव्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या