महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 लोहारा कन्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री विलास अरुण निकम यांना मा श्री विक्रम काळे शिक्षक आमदार व डॉ निशिगंधा वाड सिनेअभिनेत्री यांच्या शुभ हस्ते शाल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल हा सुमारे 25 हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांच्या राज्यस्तरीय समूह आहे.या समुहा मार्फत विद्यार्थी उपक्रमासह दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराचे आयोजन केले जाते.याकरता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उपक्रमशील कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान शिक्षकांची निवड समूह मार्फत करण्यात येते. जळगाव जिल्हा मधून यावर्षी लोहारा कन्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक विलास अरुण निकम यांची केली गेली. यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळेत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करीत असतात. गेली दोन वर्ष कोरोना ( covid 19 ) असल्यामुळे शाळा जरी बंद होती, तरी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी घरघर शाळा, शिक्षण आपल्या दारी,व्हरांडावरची शाळा यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवली. मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ( Drawing competition ), क्रीडा स्पर्धा,बाल आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.त्याचप्रमाणे विज्ञान प्रदर्शनात ( science exhibition ) जिल्हा व राज्य स्तरावर सहभाग नोंदविला आहे. जळगाव जिल्हा परिषद निर्मित 'आपला जिल्हा आपली उपक्रम'या पुस्तक निर्मितीत सुद्धा सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे विविध शैक्षणिक लेख विविध मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. शाळेला लोकसहभाग मिळवून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी पंकज पालीवाल व रावसाहेब राऊळ यांनी घेतली व त्यांची निवळ केली.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल चा राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण 15 मे रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.निशिगंधा वाड सिनेअभिनेत्री प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विक्रम काळे शिक्षक आमदार मा श्री सुधीर तांबे पदवीधर शिक्षक आमदार दिपक चामे ,सतीश कोळी राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सदस्य, पंकज पालीवाल व रावसाहेब राऊळ जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. अशा या उपक्रमशील शिक्षकास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
0 टिप्पण्या