Subscribe Us

बदल्या स्थगितबाबत आजच्या शासननिर्णय!


बदल्या स्थगितबाबत आजच्या शासननिर्णय!

सन 2022-23 या आर्थिक वर्षी दि. 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत...

🌈आजच्या निघालेल्या बदली स्थगिती पत्रक बाबत...

सदर पत्रक हे सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांशी निगडित आहे.

सामान्य प्रशासन मार्फत ज्या दरवर्षी प्रशासकीय बदल्या केल्या जातात त्या करण्यात येऊ नये यासाठी आहे.

शिक्षक यांच्या बदल्या ह्या ग्रामविकास विभाग मार्फत होत असतात त्यामुळे या पत्राचा आपल्या बदली प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.

सदर बदली स्थगिती पत्रक निघण्याचे कारण म्हणजे राज्यात विधानपरिषद आणि देशात राज्यसभा निवडणूक जाहीर* झाली आहे,नियमित बदली प्रक्रियेमुळे त्यात कुठला अडथळा येऊ नये म्हणून सदर नियमित बदली प्रक्रियेला ३० जून पर्यंत स्थगिती आहे.

आपल्या म्हणजे शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी करण्याचे कुठलेही कारण  नाही.

आपल्या बदल्या ह्या होतीलच...

अचूक व विश्वसनीय माहिती आजच फाॅलो करा नवेपर्व न्यूज📱
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या