Subscribe Us

SBI खातेदारांना मोठा झटका !


SBI मध्ये खातेधारकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे स्टेट बँकने ( State bank of India ) सांगितले आहे की, बँकेच्या नावाने आलेला मॅसेज ''प्रिय ग्राहक, तुमचे SBI डॉक्युमेंट एक्स्पायर झाले आहे. आपले अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. अकाउंट ( Account ) अनब्लॉक करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.'' असा मेसेज आल्यास हा मॅसेज त्वरित डिलीट करा. आलेल्या मॅसेजच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. नाहीतर आपल्या बँकेतील अकाउंट मधील सर्व पैसे काढले जातील. बँक अशा प्रकाराचे कोणतेही मॅसेज ग्राहकांना पाठवत नाही. म्हणून वेळीच सावध होण्याचे आवाहन स्टेट बँकने केले आहे.

अशा प्रकारच्या मेसेज मधील लिंकवर क्लिक केल्यास आपला सर्व डेटा लीक होऊ शकतो. सायबर गुन्हेगार आपली व वैयक्तिक माहिती घेऊन आपल्या बँकेच्या खात्यातील पैसे काढतात. म्हणून बँक वेळोवेळी सावध करते की आपल्या बँकेची वैयक्तिक माहिती, पिन नंबर, पासवर्ड, ओटीपी ( OTP ) कोणालाही सांगू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या