Subscribe Us

अमळनेर प्रभाग रचनेवर नगरपालिकेत दोन माजी नगरसेवकांसह नऊ जणांच्या हरकती!


अमळनेर प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेवर हरकतींच्या सूचनेनुसार अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग रचनांवर आतापर्यंत ९ जणांनी हरकत घेतली आहे. त्यात दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे फक्त प्रभाग २, ३, ५, ११, १२ आणि १६ यांच्या रचनांवर हरकती प्राप्त झाल्या आहेत. माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांनी प्रभाग १६ ची  रचना नागमोडी पद्धतीने करून शिव कॉलनीचा काही भाग वगळण्यात आला आणि सप्तशृंगी कॉलनीचा भाग जोडण्याची मागणी केली आहे. विश्वनाथ पीतांबर पाटील व महेश दगडू पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयताकृती व चौरसाकृती प्रभाग रचना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. १४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत होती. त्यावर अमळनेर नगर परिषद अभिप्राय नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहे. जिल्हाधिकारी २३ रोजी हरकतींचा निपटारा करणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवून आयोग ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचना करणार आहे. प्रभाग रचनांच्या हरकतींवर योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता अमोल भामरे, उपनगर अभियंता दिगंबर वाघ, संजय पाटील, वरिष्ठ लिपिक संजय चौधरी यांची समिती नेमण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या