Subscribe Us

पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत पाय जॅम फाऊंडेशन पुणे मार्फत उन्हाळी वर्गाचे आयोजन... (ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना कोडींग शिक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव जि.प.ची शाळा)


इयत्ता 6 वी 7 वी तील सुमारे 30 विद्यार्थी घेत आहेत कोडींग शिक्षणाचे धडे...

अमळनेर: शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये बाला उपक्रमांतर्गत लोकसहभागातून अध्ययनास पोषक वातावरण निर्मिती सह गणेशोत्सव, स्काऊटींग मधील कब पथकाचे राज्यस्तर चाचणी शिबीर, शाळे बाहेरची शाळा उपक्रमात आकाशवाणीवरील मुलाखतीसाठी विद्यार्थ्याची निवड, शाळेचा वाढदिवस, ड्रीम फाऊंडेशन पुणे तर्फे आयोजित अखंड वाचन अभियान उपक्रमातील सहभाग, मातीपासून किल्ले निर्मिती, वार्षिक स्नेह संमेलन, छात्र प्रबोधन मासिक पुणे तर्फे आयोजित शिक्षक प्रबोधन दूत योजनेतील सहभाग, व्ही स्कूल उपक्रमातील साहित्य निर्मितीसाठी विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग, मिल के चलो असोसिएशन तर्फे एक दिवशीय विज्ञान कार्यशाळा व आता कॉम्प्युटर शिक्षणातील महत्त्वाचा भाग असलेले "कोडींग शिक्षण" यावर उन्हाळी वर्गाचे आयोजन केले आहे. अमळनेर तालुक्यातील उपक्रमशिल व आदर्श शाळा म्हणून ओळख असलेल्या जि.प.पिंगळवाडे शाळेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उन्हाळी सुटीतही शिक्षकांची धडपड सुरुच... 

पुणे जि.प.च्या धर्तीवर पाय जॅम फाऊंडेशन पुणे तर्फे प्रायोगिक तत्त्वावर अमळनेर तालुक्यातील एकमेव शाळा म्हणून जि.प.पिंगळवाडे शाळेची निवड करुन इयत्ता 6 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्गाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना दररोज सकाळी दोन तास याप्रमाणे "कोडींग शिक्षण" दिले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने कोडिंग ॲण्ड प्रॉब्लेम सोल्विंग स्किल या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी पाय जॅम फाऊंडेशन पुणे तर्फे मार्गदर्शक म्हणून जयेश माळी सर यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त व कृतियुक्त सहभाग मिळत आहे. कार्यशाळेत लेखी माहिती सह लॅपटाप द्वारे व अँड्रॉईड मोबाईलवर "कोड मित्रा ॲप" द्वारे प्रत्यक्ष कृतिवर ही भर देण्यात येत आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.
          कार्यशाळा आयोजनासाठी अमळनेर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण मॅडम, पुणे येथील पाय जॅम फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोमित रॉय सर व अमळनेर येथील साने गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख भुमिका असून कार्यशाळा यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीसह मुख्याध्यापिका वंदना ठेंग, तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील, वंदना सोनवणे, सहकारी गणेश बारी व विद्यार्थ्यांचे पालक यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या