अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale ) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली.
या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये कलम 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे चांगलीच अडचणीत आली आहे. केतकी चितळेने केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल ( Social Media) मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडिया युजर्सने केतकीला सुनावलं आहे. तसेच या पोस्टमुळे अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या