(प्रतिनिधी ) राज्य अनुसूचित जाती -जमाती आयोगाचे (सामाजिक व आर्थिक) सदस्य किशोर मेढे यांचा जळगाव दौरा काल संपन्न झाला .राज्य आयोगाकडे आलेल्या जिल्ह्यातील विविध तक्रारींची सुनावणी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्येंत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली .तक्रारकर्ते व प्रशासन यांचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्याचे काम प्रशासनाने गतीने करायला हवे .शासनाच्या अनुसूचित जाती -जमातीच्या प्रवर्गासाठी असलेल्या विकास योजना पात्र लाभार्थ्यांपर्येंत गतीने पोहचायला हव्यात असे निर्देश त्यांनी या प्रसंगी सबंधितांन दिलेत. तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाने त्या तक्रारी तातडीने कायद्याच्या चौकटीत राहून सोडवाव्यात असे ही त्यांनी सबंधितांना सांगितले.जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनेत काम करणाऱ्या अनु.जाती व जमातींच्या त्या त्या विभागातील कर्मचारी वर्गांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शासन निर्णया नुसार सर्व आस्थापनांनी "तक्रार निवारण कक्ष (समिती) " गठीत करून त्या समितीचे कामकाज सुरू करावे .असे निर्देशही त्यांनी उपस्थित संबंधित विभागांना दिले.
या प्रसंगी महसूल ,जिल्हा परिषद , पोलीस प्रशासन या विभागातील तक्रारींची सुनावणी झाली. या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.
दुपार नंतर शासकीय विश्राम गृहावर त्यांची जिल्ह्यातील अनेक शिष्टमंडळांनी आयोगाचे सदस्य श्री.मेढे यांची भेट घेऊन अन्याया अत्याचार बाबत निवेदने व तक्रारी लेखी स्वरूपात आयोगास दिल्यात. पाचोरा तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा बाबत आरोपींना कठोर शासन होण्यासाठी तसेच कुटूंबियांना पोलीस संरक्षण व पुनर्वसन होण्यासाठी चर्मकार विकास संघाचे जिल्हा अध्यक्ष ऍड .चेतन तायडे व जिल्हासचिव प्रा.धनराज भारुडे व आदी पदाधिकारी यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाने ही त्यांची भेट घेऊन राखीव जागेवरील लोकप्रतिनिधिंना काम करू दिले जात नसल्याच्या तक्रारी करून आयोगास निवेदन दिले. या चर्चेच्या वेळी धरणगाव तालुक्यातील बांभोरी ,हिंगोणे ,सोनवद खुर्द ,अहिरे , तर यावल तालुक्यातील कोसगाव व रायपूर येथील सरपंच यांच्या सह मुकुंद सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
" रमाई घरकुल "योजनेच्या जलीह्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रागतिक विचार मंच ,भुसावळच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा केली यात प्रा.डॉ. जतिन मेढे ,अध्यक्ष जे.पी.सपकाळे ,प्रा.प्रशांत नरवाडे ,समाधान जाधव ,प्रशांत तायडे ,देवेंद्र तायडे ,संघरत्न सपकाळे , बोदवड पं. स.माजी सभापती किशोर गायकवाड आदींची उपस्थिती होती. सर्व समस्या जलद गतीने कायद्याच्या चौकटीत राहून सोडविल्या जातील असे आयोगाचे सदस्य श्री.मेढे यांनी सर्व शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
0 टिप्पण्या