पारोळा प्रतिनिधी: नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र राज्य समन्वय समितीची सभा संपन्न झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी धाबे ता.पारोळा शाळेचे वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांची निवड समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण जाधव यांनी केली.
गुणवंतराव पाटील हे गेल्या ३० वर्षापासुन सार्वजनिक जीवनात शिक्षक मित्र म्हणुन कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व हे समता व समानता मानणारे असुन सर्वच जातीधर्माच्या व विचारांच्या विद्यमान व माजी शिक्षक बांधवांना मदतीचे, शिक्षक हिताचे, शिक्षकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्याचे कार्य ते सतत करीत असतात. शाहुफुलेआंबेडकर यांच्या विचार व आदर्श ठेवुन कार्य करणाऱ्या समता शिक्षक संघटनेत समता जपणाऱ्या गुणवंतराव पाटील यांच्या सहभागाने व त्यांच्या मार्गदर्शनाने अधिकाधिक उत्कृष्ट कार्य करण्यासाठी खात्रीने उपयोग होईल. जिल्ह्यातील अनेक शिक्षक व इतर बांधवांनी त्यांच्या या स्तुत्य निवडीचे स्वागत व अभिनंदन केले आहे.
यावेळी गिरीष वाणी राज्याध्यक्ष (पदवीधर शिक्षक महासंघ) बबनराव आटोळे (शिक्षक संघ) अशोकराव महाले (राज्याध्यक्ष केंद्रप्रमुख संघ) गौतम कांबळे (राज्याध्यक्ष कॉस्टस्ट्राईब शिक्षक संघ) संतोष राजगुरु (राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघ) प्रकाश घोळवे(राज्य समन्वयक) आदी मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांनी शुभेच्छा देऊन गौरव केला.

0 टिप्पण्या