Subscribe Us

वीज पडण्याचे ठिकाण १५ मिनिटांपूर्वी समजणार !


मान्सूनच्या कालावधीत पावसाळ्यात विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी "दामिनी" अँप तयार केले आहे. हे अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली देत आहोत.

आपल्या सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपण सर्वांनी "दामिनी" अॅप डाऊनलोड करून घ्यावे. हे अॅप अतिशय उत्कृष्ट असून GPS लोकेशनआधारे कार्य करते. वीज पडण्याच्या १५ मिनिटांपुर्वी या ॲपमध्ये वीज पडण्याची स्थिती दर्शविण्यात येते. या अॅपमध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या ठिकाणापासुन आपण सुरक्षित स्थळी जावे. तसेच अशा वेळी किंवा पाऊस सुरु असेल अशा वेळी झाडाचा आश्रय घेऊन झाडाखाली उभे राहू नये.

दामिनी अॅप मोबाईलमध्ये घेण्यासाठी👉 येथे क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या