पुणे प्रतिनिधी: पुणे येथे आज दि.15 मे 2022 रोजी महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्यस्तरीय सन्मान सोहळा-2022 या कार्यक्रमात श्री.गजानन चौधरी यांनी निर्मिती केलेल्या QR Code वर आधारीत निर्मिती केलेल्या (300 पेक्षा अधिक व्हिडिओज) चौधरी मराठी अक्षर ओळख व Chaudhary English Alphabet या दोन पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम काळे साहेब (शिक्षक आमदार), निशिगंधा वाड (सिनेअभिनेत्री ), सुधीर तांबे साहेब ( पदवीधर आमदार), माजी जि.प.अध्यक्ष लातुर मीठाराम राठोड साहेब, दीपक चामे, संपूर्ण MSP टिम व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. दोन्ही पुस्तकांच्या प्रत्येक पानावर QR अंकित केलेला आहे. त्यामुळे LKG, UKG व पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी ABCD व अ,आ,इ,ई अक्षर ओळख, सुलेखन व शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी, आशय आकलन होण्यास सहाय्यभूत ठरेल, दोन्ही पुस्तकात 300 पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडीओ आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक तेथे QR Code ची योजना केल्यामुळे ही पुस्तके अधिक विद्यार्थी प्रिय होईल शिवाय विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषेची प्राथमिक ओळख करून देताना शिक्षकांनाही साह्यभूत ठरेल यात शंका नाही. असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
सदर पुस्तक LKG, UKG, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक कोविड १९ च्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी प्रभावी ठरेल. पुस्तक निर्मितीसाठी त्यांना गटशिक्षणाधिकारी वसमत श्री.भोसले सर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सोनुने सर, केंद्र प्रमुख गिरगाव पाईकराव सर, कें.मु.अ.गिरगाव मोरे सर व ग्रामस्थ व सर्व शिक्षकवृंद पार्डी खुर्द यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे.
0 टिप्पण्या