माननीय आमदार बच्चुभाऊ कडू शिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटना जळगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले 4 सप्टेंबर 2018 च्या शासन परिपत्रक अन्वये जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ बंद करण्यात आलेली आहे. ही वेतनवाढ शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना वेतनवाढ देण्यात येत होती. जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यासोबत शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून आदर्श शैक्षणिक कार्य व गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षकांना दिनांक 4 सप्टेंबर 2018 चा शासन निर्णय आता अंशत:बदल करून बंद केलेली वेतनवाढ पूर्ववत सुरु करण्यात यावी यासाठी मंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना जिल्हा अध्यक्ष, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटना जळगाव समाधान जाधव, सचिव गोविंद वंजारी, महिला प्रमुख लीना अहिरे, विजय निंभोरे, पद्माकर पाटील, प्रवीण मोरे, अतुल पाटील, प्रदीप साखरे, सुरेश अहिरे ही शिक्षक मंडळी उपस्थित होती.
0 टिप्पण्या