बँकिंग ( banking ) क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा ( bank strike) इशारा दिला आहे. मे महिन्याच्या अखेरीस बँकेशी संबंधित तातडीची कामे असतील तर ते लगेचच पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मे महिन्याच्या शेवटी एक-दोन दिवसाच्या संपावर जाणार असल्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
विविध बँकांच्या अनेक बड्या बँक कर्मचारी संघटनांनी या संदर्भात संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून असंतोष असून बँका आपल्या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. चौथा शनिवार २८ मे आणि रविवार २९ मे या दिवशी बँका बंद आहेत. जर संप पुकारण्यात आला तर तो ३० आणि ३१ मे असा राहणार आहे. म्हणजेच, शनिवार ते मंगळवार सलग ४ दिवस बँका बंद राहणार आहेत.

( Note- Image copyrighted naveparvnews )
0 टिप्पण्या