Subscribe Us

संत श्री सखाराम महाराज अमळनेर पालखी सोहळा उत्साहात साजरा!


अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थांनच्या पालखी (sant sakharam maharaj palakhi) उत्सव दि.१६ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला उत्साहात साजरा करण्यात आला. प.पू.प्रसाद महाराज यांच्या हस्ते बालाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करुन मूर्तीला पालखीत बसविण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.
             भुसावळच्या रेल्वे युनियन बँड (Bhusawal railway band) पथकाने पालखी सोहळ्यात करमणूक करुन पालखी उत्सवाची शोभा अधिकच वाढवली. या बँड पथकाने सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेतले. कोरोना (Covid-19) काळानंतर तब्बल दोन वर्षांनी पालखी सोहळ्याच्या आनंद भाविकांनी घेतला. त्याचप्रमाणे त्रिमूर्ती युवा झांज पथक माळीवाडा यांनी ढोल ताशे वाजवून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. ढोल ताशे वाजवणारे युवक व युवती यांच्यात खूप उत्साह दिसत होता. त्रिमूर्ती युवा झांज पथकात सर्व युवक उत्स्फूर्तपणे सहभागी होते.
             पालखी सोहळ्यात पोलिस (police) पथकाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे. संत श्री सखाराम महाराज यात्रेनिमित्त पालखी उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो. यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी रेलचेल दिसून आली, सकाळी सहाच्या सुमारास पालखीची विधिवत पूजा करुन वाडी संस्थानातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीच्या मागे प.पू.प्रसाद महाराज पायी चालत भाविकांना दर्शन व आशिर्वाद देत होते. पालखी मार्गावर पान सुपारीसाठी महाराज अनेक भक्तांच्या घरी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे पालखी मार्गात विविध सामाजिक संस्था, मंडळे व मान्यवरांच्या वतीने पाणी, खाद्यपदार्थ तसेच नास्त्याची देखील सोय करण्यात आली होती. वाडी संस्थान-सराफ बाजार-फरशी पूल-पैलाड यानंतर संध्याकाळी पालखी मिरवणूक पुन्हा वाडी संस्थानात आली. 
             सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पालखी सोहळ्यानिमित्त राजे संभाजी (raje sambhaji) मित्र परिवार व शिरिषदादा फाउंडेशन (shirishdada foundation) यांच्या वतीने राजे संभाजी चौक दगडी दरवाजा येथे भाविकांसाठी रणरणत्या उन्हात मोफत थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले. माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते स्व.जितेंद्र बारी, स्व.गोपाल पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून थंडगार मठ्ठा वाटपास सुरुवात झाली. यावेळी राजे संभाजी मित्र परिवाराचे सदस्य व शिरीषदादा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या