अमळनेरहुन धरणगावकडे जाण्यासाठी असलेला सती माता मंदिराच्या बाजूने तयार करण्यात आलेला सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब असल्याने सदर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा होता, सदर रस्ता हा भारतीय रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली असल्याने रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन सदर रस्त्याचे डांबरीकरण करायला सुरुवात केली आहे. तरी सर्व नवेपर्व न्यूजच्या वाचकांना आणि प्रवाशांना सुचित करण्यात येते की हा मार्ग उद्या दि. २१ मे २०२२ ते दि. २३ मे २०२२ या तीन दिवसांच्या कालावधीसाठी दळणवळणसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. या कालावधीत अमळनेरहुन धरणगावला जाण्यासाठी ढेकु-सारबेटे या मार्गाचा उपयोग केला जावा असे रेल्वे प्रशासनामार्फत सुचित केले गेले आहे.
0 टिप्पण्या